रत्नागिरी :
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर भाजप कार्यकर्त्यात उत्साह; आज रत्नागिरी मधील मारुती मंदिर येथे जोरदार जल्लोष करणार!
सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत
अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निमित्ताने राज्याच्या भाजप कार्यकर्त्यानी आज हा आनंद सोहळा भव्य स्क्रीन वर एकत्रित पाहून साजरा करण्याचे ठरवले आहे
हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी मारुती मंदिर येथे ढोल ताशा वादन, फटाके , मिठाई या जय्यत तयारी सह बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे
नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार व्हावे जिल्हा उपाध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे, जिल्हा चिटणीस सचिन करमरकर आणि जिल्हा चिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केले आहे
.












