वेंगुर्ले : प्रतिनिधी
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत गुरुवार ३० एप्रिल रोजी पंचायत समिती वेंगुर्ला कार्यालयातील बॅ. नाथ पै सभागृह, वेंगुर्ला येथे विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार श्रवण यंत्र, व्हील चेअर व वॉकर यांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये धुवा महादेव म्हापसेकर (जि.प. शाळा वेंगुर्ला नं. १- श्रवण यंत्र), साई सचिन पडते (वेंगुर्ला वडखोल -श्रवण यंत्र),
तन्वी महेश शिरोडकर (श्रवण यंत्र -तुळस हायस्कूल), समर्थ हेमंत आंबेरकर (तुळस हायस्कूल -श्रवण यंत्र), हर्षिता रविंद्र केळुसकर (सुरुगपाणी केंद्रशाळा -व्हील चेअर), करण संतोष होडावडेकर (उभादांडा भेंडमळा -व्हील चेअर)
भक्ती कृष्णा शेलटे( आरवली नं. १ व्हील चेअर), श्रीया सुनिल परब (तुळस वडखोल- वॉकर) याप्रमाणे सभापती शंकर घारे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास गट शिक्षणअधिकारी संतोष गोसावी, सहाय्यक प्रशासन अधिकारी संदीप तांबे, सभापती/उपसभापती यांचे स्वीय सहायक महेश नाईक, विषय तज्ञ विनोद सावंत, श्री. भोकरे, मिलिंद सरवंदे, श्री. पवार, नितीन चव्हाण तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात आवश्यक सहाय्य मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. पंचायत समिती वेंगुर्ला मार्फत अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सभापती शंकर घारे यांनी दिली.












