वैभववाडी | प्रतिनिधी : श्री कुंभजाई एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित अभिनव विद्यामंदीर इंग्लिश मिडीयम स्कूल सोनाळी प्रशालेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा शैक्षणिक वर्ष सन २०२४- २५ मध्ये प्रशालेमध्ये क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला.
सदर क्रीडा महोत्सवामध्ये विविध क्रीडा स्पर्धांच्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. मैदानी क्रीडा प्रकारात कबड्डी, खो-खो, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, रिले, फनी गेम, इ .सांघीक खेळ तसेच कॅरम, बुद्धिबळ अशा वैयक्तिक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या शारीरिक तसेच बौद्धिक कलागुणांना वाव मिळून त्यांचे खेळातील कौशल्य विकसित व्हावे. यासाठी सदरील स्पर्धांचे आयोजन दरवर्षी शाळा स्तरावर करण्यात येते. सदर क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य तसेच मार्गदर्शन लाभले.
यावेळी मुख्याध्यापक श्री.प्रकाश गोसावी, शिक्षक श्री तुषार तांबे, सौ .ललिता डोंगरे, सौ.समीरा पवार, श्रीमती. सुचिता जाधव, श्रीमती मयुरी मांजलकर, सौ .तृष्णा तांबे, सौ.स्वाती गोसावी, सौ साक्षी गुरव, श्रीमती . दिक्षिता भोसले, सौ समिरा पवार, श्री पुरुषोत्तम रावराणे, श्री प्रशांत पवार, श्री.महेंद्र लाड, श्री देवेंद्र सुतार, श्रीमती सुगंधा मोरे, सौ .वैदेही नागप व ग्रामस्थ उपस्थित होते.












