कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी l प्रतिनिधी : खांबाळे येथे श्री देवी आदिष्टी मंदिराचा 23 वा वर्धापन दिन सोहळा दिनांक 19 व 20 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त दोन दिवस मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. 19 रोजी रात्री 10 वाजता कीर्तनकार ह. भ. प. शिवलीला ताई पाटील सोलापूर यांचे समाज प्रबोधनपर किर्तन होणार आहे.
तसेच वर्धापन दिनानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रविवार दिनांक 19 रोजी पहाटे 5 वाजता प्रात : स्मरण, काकड आरती, सकाळी 10 वा. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 6 वा. हरिपाठ, सायंकाळी 7 वा. भजन, रात्री 9 वा. पालखी सोहळा, रात्री 10 वाजता कीर्तन, कीर्तनकार ह भ प शिवलीलाताई पाटील सोलापूर तसेच सोमवार दि. 20 रोजी दुपारी 2 वा. हळदीकुंकू, रात्री 9 वाजता पालखी मिरवणूक, रात्री ठीक 10 वाजता चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जलवा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या उत्सवाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री देवी आदिष्टी देवस्थान स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती खांबाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.












