मुलीचा दुर्दैवी मृत्यू : झरेबांबर येथील दुर्घटना
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग – बेळगाव मार्गावर झरेबांबर तिठा येथे भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने सुसाट वेगात शाळकरी मुलीला चिरडले. या अपघातात सदर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या अंगावरुन टेम्पो (एमएच ०९ सीयू ७९४९) गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज दुपारी घडली. श्रिया संदीप गवस (वय ७ वर्षे, रा. मांगेली) असे तिचे नाव आहे. या घटने बद्दल स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.











