आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर नगरपरिषद प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही : परिसर केला मोकळा
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहारात कचरा प्रश्नी तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. नागरिकांना कोणत्याही समस्या निर्माण होता नये. कोणत्याही ठिकाणी कचरा साचून राहता नये याबाबत नगरपरिषद प्रशासनाने नियोजन करून कचरा उचल कार्यवाही तात्काळ करावी. अश्या सूचना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. दरम्यान नगरपरिषद प्रशासनाने सागरी महामार्ग तसेच अन्य काही ठिकाणी ठिकाणी जमा झालेला कचरा तात्काळ उचलून परिसर मोकळा केला.
कचरा उचल प्रक्रिया अधिक गतिमानपणे राबवण्यात येत आहे. कोणत्याही ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर प्रशासनाने अधिक तत्परतेने तात्काळ कार्यवाही केली आहे. असे सांगत शिवसेना मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी नगरपरिषद प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच यापुढे शहारात कोणत्याही भागात कचरा साचणार नाही याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच कोणत्याही ठिकाणी कचरा जमा झाल्यास तात्काळ कचरा उचल अशीच चालू ठेवावी असेही दीपक पाटकर यांनी सांगितले.













