चिंदर भटवाडी पालकरवाडी मार्गे लब्देवाडी एसटी बस ९ डिसेंबर पासून सुरु होणार
चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे यांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : विद्यार्थी व प्रवासी वर्गाच्या सोयीच्या दृष्टीने ग्रामपंचायत चिंदर यांनी चिंदर भटवाडी पालकरवाडी मार्गे लब्देवाडी ब्राम्हणदेव मंदिर मार्गांवरून एसटी बस फेरी सुरु करण्यासासाठी केलेल्या मागणीला एसटीच्या विभाग नियंत्रकांकडून मान्यता मिळाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर व पालकरवाडी ग्रामस्थांनी यासाठी विशेष मेहनत घेतल्याबद्दल चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांनी आभार मानले आहेत.
सोमवार 9 डिसेंबर पासून ही फेरी सुरु होणार आहे. याबाबत मालवण एसटी प्रशासनाच्या वतीने याबाबत माहिती दिली आहे.








