नातूनगर मोहल्ला येथील प्रकार
खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील नातूनगर मोहल्ला येथील चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल ४ लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ६ रोजी उघडकिस झाली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्ताक सिराज काँडेकर, (वय- ४६ वर्षे, व्यवसाय रिक्षा, मुळ रा. नातुनगर मोहल्ला ता. खेड जि. रत्नागिरी सध्या रा. रुम नं.२०२, जबल अलनुर, डाकबंगला, ता.खेड) यांनी तक्रार दाखल केली असून फिर्यादी यांचे नातूनगर मोहल्ला येथील घरातून अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे घराचे दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून त्यावाटे आत शिरुन घरातील दोन लोखंडी कपाटाचे दरवाजे कोणत्यातरी कठीण हत्याराने उघडून कपाटात ठेवलेले सोन्या- चांदीचे २,लाख ६० हजार रु. किंमतीचे दागिने तसेच फिर्यादी यांचे चुलत भाऊ तौसिफ मकबुल कोंडेकर याचे घरातील दोन लोखंडी कपाट तोडून त्यामधील सोन्या-चांदीचे १ लाख ,४१, हजार ५००रु. किं.चे दागिने व रोकड असा तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेला.











