खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील चाकाळे येथे इसम विशाल सुधाकर चव्हाण वय वर्ष ४२ मुरडे येथील विहरीत पाण्याचा पंप काढण्यासाठी उतरला असताना बुडून मृत्यू.झाल्याची घटना रविवारी घडली
या घटनेची माहिती मिळताच खेड येथील सामाजिक संस्था विसर्जन कट्टा खेड चे अध्यक्ष संतोष शिंदे सदस्य साहिल बुटाला निखिल चौधरी मदत ग्रुप खेड खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी नगरपालिका अग्निशामक विभागाचे कर्मचारी सूरज शिगवण जयेश पवार यांनी विहिरीमध्ये उतरत अथक परिश्रमाने इस्माचा मृतदेह बाहेर काढला.












