खेड (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाखालील क्रिकेट संघात खेड क्रिकेट ॲकॅडमीचा, खेळाडू धनंजय झोरे याची निवड झाली आहे. यापूर्वी त्यांची १६ वर्षाखालील मुलांच्या राष्टीय गटात क्रिकेट प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
धनंजय झोरे याने तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. क्रीडा प्रशिक्षक कैलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तो क्रिकेटचे धडे गिरवत आहे. महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल कैलास सावंत यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.