खेड (प्रतिनिधी) लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडुन भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. व बाबासाहेबांनी दिलेला आदर्शवत असा “वाचाल तर वाचाल” हाच धागा पकडत येथील खेड नगरपालिकेच्या वाचनालयास आजच्या दिवशी विविध प्रकारची पुस्तके भेट देण्यात आली.
वाचनालयाचे व्यवस्थापक बाळाराम तथा बाळासाहेब खेडेकर यांचेकडे अध्यक्ष सुरेश चिकणे, यांनी व त्यांचे सहकारी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉ. विक्रांत पाटील, सचिव संतोष शिंदे, खजिनदार प्रवीण पवार, प्रतीक गिल्डा, माणिक लोहार व वाचन प्रेमी उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी वाचनालयाचे व्यवस्थापक बाळाराम तथा बाळासाहेब खेडेकर यांनी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडुन राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. व या पुस्तक रुपी भेट देऊन आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना लायन्स क्लबच्यावतीने एक आगळी वेगळी आदरांजली वाहून समाजासमोर एक चांगला आदर्श उभा केल्याबद्दल लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.












