जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत रणजीत देसाई यांनी केले मार्गदर्शन
स्वप्निल कदम l कुडाळ :भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला कुडाळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा कुडाळ कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा संयोजक समिती अध्यक्ष रणजीत देसाई, भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी बाबत मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून विक्रमी सदस्य नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी केले. नोंदणी संदर्भात आलेल्या टेक्निकल अडचणी रणजित देसाई यांनी निरसन करून नोंदणी संदर्भाबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बंड्या सावंत, अभय परब, निलेश परब, संदेश नाईक, सुनील बांदेकर, रावजी कदम, राजा प्रभू, अशोक कंदुरकर, नारायण शृंगारे तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.












