ओटवणे (प्रतिनिधी ) केंद्रबल गट मजगाव,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात ओटवणे शाळा नंबर एक ने आपल निर्विवाद वर्चस्व गाजविताना अनेक क्रीडा प्रकारात यश मिळवत पुनः एकदा आपला दबदबा निर्माण केला. ओटवणे हायस्कूल च्या क्रिडांगणात पार पडलेल्या मैदानी प्रकारात 100 मिटर प्रकारात प्रेम गावकर द्वितीय तर मुलींमधून नंदिनी काटाळे हिने प्रथम क्रमांक मिळवीला. 200 मिटर धावणे प्रकारात जयराम गावकर प्रथम, गोळा फेक प्रकारात रुद्र सुधाकर बुराण प्रथम तर आराध्य मंगेश गावकर द्वितीय ठरला. रिले 50 × 4 प्रकारात मुलांनी व मुलींनी द्वितीय क्रमांक मिळविला. तर खोखो प्रकारात लहान गट मुलगे, मुली दोघांनीही प्रथम क्रमांक तर मोठा गट मुलगे, मुली प्रथम क्रमांक मिळवीत खोखो प्रकारातील सातत्य अबाधित ठेवल. कबड्डी प्रकारात मोठा गट मुलगे प्रथम तर लहान गट मुली प्रथम, लांब उडी मोठ्या गटातून अथर्व आनंद गावकर प्रथम तर उंच उडी मोठ्या गटातून कृष्णा पांडुरंग गावकर द्वितीय ठरला.
तर चराठा शाळा नंबर एक येथे पार पडलेल्या ज्ञानी मी होणार, समूह गीत, समूह नृत्य प्रकारात आपले सातत्य राखत यश संपादित केले. समूह गीत मध्ये मोठा गट प्रथम तर लहान गट द्वितीय, समूह नृत्य मध्ये मोठा गट प्रथम तर लहान गट द्वितीय ठरला तर ज्ञानी मी होणार मध्ये मोठ्या गटातून रुद्र सुधाकर बुराण जयराम संदीप गावकर या विध्यार्थांनी भाग घेत मोठ्या गटात शाळेला प्रथम क्रमांक मिळवून दिला.माजगाव केंद्रात ओटवणे शाळा नंबर 1 चे कायमच अस्तित्व राहिले असून या वर्षीही ओटवणे शाळा नंबर 1 च्या मुलांनी लौकिकला साजेशी कामगिरी करीत शाळेला निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले.त्यांच्या या यशाबद्दल विध्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक वृंदांचे शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच मुख्याध्यापक प्रकाश गावडे यांनी अभिनंदन केले.












