सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी “परफेक्ट अकॅडमी” शिक्षणाचे नवे दालन

New hall of education “Perfect Academy” for higher education for common students of Sindhudurg district

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उच्च शिक्षणाची दालने खुली करण्यात येथील परफेक्ट अकॅडमीच्या मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट अकॅडमी चांगले काम करत असून प्रोफेसर राजाराम परब यांच्या रूपाने या जिल्ह्याला चांगला शिक्षण महर्षी मिळाला आहे असे गौरव उद्गार गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काढले.ओरोस येथे नव्याने परफेक्ट अकॅडमी संस्थेची शाखा शुभारंभ गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी त्यांच्या पत्नी स्मिता पार्सेकर नानासाहेब बेहरे, नकुल पार्सेकर, महादेव परब, शेखर सावंत, देसाई शामल नाईक , भोसले सावंत कॉलेजचे अच्युत सावंत भोसले प्राचार्य राजाराम परब व मान्यवर पालक विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी इमारतीचे फीत कापून दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले यावेळी उज्वल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा अनेक अकॅडमी गोवा राज्यात आहेत परंतु परफेक्ट अकॅडमी ने गोवा कानको सहभागात स्थापन केलेल्या शाखा उत्तम प्रकारे शैक्षणिक सुविधा आणि शिक्षण देत आहेत राजाराम परब यांनी या परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून भावी पिढी घडविण्याची जेई नीट सारख्या शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थी घडवून डॉक्टर ,इंजिनिअर व अन्य क्षेत्रात सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचे कार्य परफेक्ट आहे आज अनेक विद्यार्थी त्यांच्या या अकॅडमी मधून यश संपादन करत आहेत अकेले ही आहे तामिळनाडू सारख्या भागात प्रथम लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतर होऊ पाहत आहे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांचे नाव उज्वल करण्याचा राजाराम परब यांचा हा प्रयत्न समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी उभी केलेली ही व्यवस्था ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी परफेक्ट अकॅडमीच्या या शैक्षणिक प्रवाहात जिद्दीने उतरून उत्तम प्रशिक्षण घेतल्यास निश्चित यश मिळू शकते

यावेळी नानासाहेब बेहरे म्हणाले आपल्या जीवनात ध्येय चांगले व उत्तम कसे होईल या दृष्टीने परफेक्ट अकॅडमी विद्यार्थ्यांचा आदर्श समोर ठेवत आहे यातून आज अनेक विद्यार्थी घडत असून ग्रामीण भागातील सामाजिक दृष्टिकोनातून विद्यार्थी घडवून आपले नाव ओळख परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून दिसू लागली आहे यातच त्यांचे यश व उज्वल भवितव्य दडले असल्याचे ते म्हणालेअटल प्रतिष्ठानचे नकुल पार्सेकर म्हणाले ही संस्था उभी करण्यासाठी सामाजिक जीवनात अनेक यातना भोगावे लागतात विद्यार्थी शिक्षणा मध्ये उज्वल होण्यासाठी त्यांनी स्वप्नाची पाठलाग केली पाहिजे आज शिक्षण क्षेत्रात सह अनेक क्षेत्र गतिमान त्याने पुढे पुढे जात आहेत आपण योग्य तो निर्णय घेतल्यास परफेक्ट अकॅडमी आपल्या पाठीशी उभी राहील

भोसले सावंत कॉलेजचे अच्युत भोसले म्हणाले परफेक्ट अकॅडमी ते राजाराम परब यांचे गेल्या काही महिन्यात आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळाले त्यांच्या विद्यार्थी घडविण्याची चमक माझ्या मुलीच्या मार्गदर्शनातून मला मिळाले त्यांच्या या कार्याला आपल्या शुभेच्छा देत आपले सदैव सहकार्य राहील अनेक विद्यार्थी या अकॅडमी मधून घडावेत त्या दृष्टीने परफेक्ट अकॅडमी परफेक्ट असल्याचे सूचक उद्गार त्यांनी काढलेप्रारंभी प्राचार्य राजाराम परब यांनी प्रास्ताविक पर भाषणात परफेक्ट अकॅडमीच्या प्रवासाची व आतापर्यंत सुरू असलेल्या शाखा त्यातून डॉक्टर इंजिनियर व अन्य क्षेत्रात चमकलेल्या विद्यार्थ्यांची यशोगाथा कथन करत किशोरवयीन विद्यार्थ्यापासून विद्यार्थी घडविण्याची टॅलेंट निर्माण केली पाहिजे आतापर्यंत 70 ते 80 विद्यार्थी प्रवेश करते असून जून अखेर जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या वाढू शकेल या शैक्षणिक चळवळीत ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुविधा व्यवस्था उपलब्ध करून योग्य ते मार्गदर्शन करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले शेवटी उपस्थित यांचे आभार मंदार सर्वेकर यांनी मानले सोबत फोटो