अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात दि. १६ डिसेंबर पासून रंगणार ‘छंदोत्सव’

 

रत्नागिरी : र .ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास होण्यासाठी राबविण्यात येणारा आणि अभ्यासेतर उपक्रमांचा मानबिंदू असणारा छंदोत्सव दि. 16 डिसेंबर ते २१ डिसेंबरपर्यंत होणार आहे. दि. १८ डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होईल व दिनाक्न २१ डिसेंबर पर्यंत विविध स्पर्धा घेऊन पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.

विद्यार्थ्यांचां अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून दरवर्षी छंदोत्सवाचे आयोजन करण्यात येते. छंदोत्सव म्हणजेच विविध छंदांचा उत्सव ! विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे त्यांच्या सुप्त कलागुणांना कौशल्यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा व विद्यार्थ्यांना रंगमंचावर पदार्पणाची संधी देणारा, त्याबरोबरच सर्जनशीलतेचे सप्तरंग विद्यार्थ्यांच्या मध्ये वृद्धिगत करणारा हा उत्सव आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, नृत्य अभिनय . नाद , लय , ताल आणि शब्द या अष्टगुणांना मुक्त व्यासपीठ मिळते व महाविद्यालयामध्ये अनेक प्रतिभावंत कुशल विद्यार्थी तयार होतात. महाविद्यालयाने राबवलेल्या छंदोत्सव कार्यक्रमाचे हे फलित आहे. छंदोत्सवमधील

विविध उपक्रमांची थोडक्यात रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता जवाहर क्रीडांगण येथून शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर याच दिवशी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रदर्शनांचे
उद्घाटन होणार आहे. यामध्ये फोटो ग्राफी स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इ विविध स्पर्धा , विविध हस्तकला प्रदर्शनाचे व फूड फेस्ट चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. 4.00वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा व 4.30 वा. शामराव करंडक एकांकिका स्पर्धा उद्घाटनहोईल.. 5.00वाजता एकांकिका स्पर्धा सादरीकरणाला प्रारंभ होईल.शब्द एक आविष्कार अनेक हे सूत्र असलेल्या ह्या स्पर्धेत या वर्षी ‘अस्तित्व’ हा शब्द देण्यात आला आहे. मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 दहा वाजता घंटा नाद सन्मान प्रदान केला जाईल त्यानंतर गीत गायन स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा विविध गुणदर्शन असे कार्यक्रम व नंतर विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येईल व छंदोत्सव संपन्न होईल. बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते मैदानी क्रीडा स्पर्धांचे
उद्घाटन होणार आहे तसेच दिवसभर विविध इनडोअर व आउटडोअर क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहेत.

छंदोत्सवामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होऊन आपल्यातील विविध कला कौशल्यांचा आविष्कार घडवतात . छंदोत्सवातूनच सादरीकरणाची सुरुवात करून विद्यार्थी पुढील विद्यापीठस्तर स्पर्धा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश प्राप्त करतात. हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वीपणे व नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी र. ए. एज्युकेशन सोसायटीचे सर्व संस्था पदाधिकारी,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, छंदोत्सव प्रमुख प्रा. वैभव कानिटकर तसेच आर्ट्स, कॉमर्स, वाणिज्य, एम.सी. व्ही. सी. शाखांचे विभाग प्रमुख व छंदोत्सवासाठी स्थापन केलेल्या शिक्षकांच्या विविध
समित्या यामध्ये स्वागत समिती, बक्षीस वितरण समिती, प्रसिद्धी समिती, सूत्रसंचालन समिती, शोभायात्रा समिती, रंगमंच समिती, विविध प्रदर्शन समिती, निमंत्रण समिती, गीत गायन समिती, नृत्य स्पर्धा समिती, तंत्रज्ञान सहाय्य समिती, फॅन्सी ड्रेस व विविध फिलर्स समिती, फूड फेस्ट समिती, क्रीडा समिती इत्यादींच्या नियोजनामुळे सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत.