चिंदर ग्रामपंचायत आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

71 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

आचरा -अर्जुन बापर्डेकर : चिंदर ग्रामपंचायत आणि निर्भया बहुउद्देशिय सेवाभावी संस्था बसरेवाडी मोफत आरोग्य शिबिर चिंदर ग्रामपंचायतिच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाले. याशिबिराचा 71 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

शिबीराचे उदघाट्न चिंदर सरपंच स्वरा पालकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने
करण्यात आले.यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, माजी सभापती हिमाली अमरे, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कपिल मेस्त्री,डॉ. सचिन सुतार, डॉ. स्वाती जोगल, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, स्वरा चिंदरकर, संदिप परब चिन्मयी पाताडे, भाई तावडे, संतोष अपराज, विवेक घाडगे, गोटया अपराज आदी उपस्थित होते.

या शिबिरात मधुमेह व रक्ततपासणी,
बालकांची तपासणी,इसीजी,शुगर आदी तपासण्या करण्यात आल्या.