आरपीडी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक जी.ए. बिरंबोळे यांचे निधन

सावंतवाडी : येथील आरपीडी हायस्कूलचे गणित विषयाचे सेवानिवृत्त
शिक्षक श्री. गुणवंतराव बिरंबोळे (वय ७० वर्षे) यांचे किरकोळ आजाराने वारणा नगर येथे बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या आरपीडी हायस्कूलमध्ये तसेच दोडामार्ग हायस्कूलमध्ये त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे काम केले. आरपीडी हायस्कूलमध्ये ते नोकरी करत होते. परंतू सावंतवाडीतील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. आरपीडी हायस्कूलमध्ये अनेक वर्षे त्यांनी एन.सी.सी. ऑफीसर म्हणून काम केले. दि.२३ एप्रिल २०२६ रोजी आरपीडी हायस्कूलमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, जावई व नातू आहे.