कोल्हापूरच्या धरतीवर मंत्री नितेश राणे यांचे कणकवलीत कट आउट 

 

मंत्री महोदय…नितेशजी राणे साहेब’ आशयाचे कट आउट 

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी काल नागपूर येथे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिपदाचे शुभेच्छा देणारे कटआउट कणकवली तालुक्यात झळकलेले पाहायला मिळत आहेत.नितेश राणे हे तिसऱ्या वेळी आमदार झाले. यावेळी त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे. त्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे बुवा यांनी कोल्हापूरच्या धरतीवर मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा देणारे वेगवेगळे कट आउट कणकवली शहर प णि ग्रामीण भागात लावले जात आहेत. यावेळी संपूर्ण कणकवली शहरात ठीक ठिकाणी “हार्दिक अभिनंदन..! “मंत्री महोदय’ नितेश जी राणे साहेब अशा आशयाचे कट आउट झळकले आहेत.