मनसेचे राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग चिपळूण यांना निवेदन
शृंगारतळी (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील पालपेणे फाट्या समोरील पुल मार्केट रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग चिपळूण यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पालपेणे फाट्या समोरील पुलमार्केट येथील रस्ता खड्डेमय झाला असून
रस्त्याची खूपच दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून सतत वाहतूक सुरू असते.
तसेच रस्त्यावरील धुळीमुळे आजू-बाजूचे आणि परिसरातील व्यापारीही त्रस्त झाले आहेत . याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही काही फायदा होत नसल्याचे दिसून येते.सदर रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्थितीत बुजविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचें बनले आहे. सतत वाहतूक होत असल्याने रस्त्यावरील धुळीपासून प्रवासी ग्राहक व व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे. या निवेदनावरती मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, महेश अवेरे, नरेंद्र शिर्के, अकेली वासावे, आरती जानवळकर, रामचंद्र देवळेकर, प्रशांत शिरगावकर, प्रमोद वेद्रे, कमलाकर वनगे, वसंत जानवळकर, विनायक शिर्के, विठ्ठल घाणेकर, धीरज कदम, राजेश शिगवण, दत्ताराम कोंडविलकर या व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.










