‘उधना-मंगळूर’ला अडीच तासांचा विलंब

खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणारी उधना-मंगळूर गाडी सोमवारी २ तास ३० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची चांगलीचरखडपट्टी झाली. गाडी विलंबानेधावण्यामागचे नेमके कारण समजूशकले नाही.
या गाडीपाठोपाठ थिविम अहमदाबाद स्पेशल १ तास ३० मिनिटे, तर सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस १ तास ४५ मिनिटे विलंबाने रवाना झाली. सावंतवाडी-दिवा पॅसेंजरसह निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसलाही १ तासांचा लेट धावली.