
गुहागर | प्रतिनिधी : पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर यांच्या वतीने पडवे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा दि. २० डिसेंबर २०२४ व दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे आयोजित केल्या आहेत.
या दोन दिवसशीय स्पर्धा ६ वर्षाने परत एकदा मु. पो. तवसाळ तांबडवाडी मध्ये संपन्न होणार आहेत. याचे उत्तम नियोजन तवसाळ तांबडवाडी मधील ग्रामस्थ, महिला मंडळ, युवा वर्ग आणि मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशा स्वरूपाचे करण्यात आले आहेत. तसेच पडवे केंद्राच्या एकुण १३ शाळा मधुन शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग आणि पालक उपस्थित रहाणार आहेत. तवसाळ तांबडवाडी क्रिडा नगरीत ग्रामस्थांनी येणार्या सर्व शाळांमधील मुलांनसाठी स्वच्छता करत मैदानाची पुर्व तयारी पहायला मिळते.
या स्पर्धा सांघिक क्रिडा प्रकार लहान गट मोठा गट खोखो, कबड्डी, लंगडी, क्रिकेट स्पर्धा, वयक्तीत खेळ लांब उडी, उंच उडी,थाली फेक,गोळा फेक, धावणे, यामध्ये सर्व जास्त गुण संपादन करणारी शाळा तवसाळ तांबडवाडी ग्रामस्थ व महीला मंडळ नावाचा champion चषक कोणती शाळा सरस ठरनार आहे.दोन दिवसांची वाट पहावी लागणार आहे.











