विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबीर’ पाट येथे राबविला जाणार

 

मंडणगड/ प्रतिनिधी : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबीर’ दि. २१ ते २७ डिसेंबर दरम्यान तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत पाट येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल मराठे, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना श्री. अभिजीत कुंभार, मुख्याधिकारी मंडणगड नगरपंचायत, तसेच आंबडवे उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉ. आसिफ खान यांच्या हस्ते आणि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. दिपक रावेरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी पाट ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. सुषमा दिवेकर, उपसरपंच श्री. सचिन चिले, पोलिस पाटील श्री. नथुराम दिवेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पाट तसेच तलाठी अलीमिया सय्यद, ग्रामसेवक सौ. गितांजली शिंदे, महाविद्यालयाचे माजी समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. अशोक साळुंखे, रा.से.यो.चे सल्लागार श्री. सुदर्शन सकपाळ, ग्रामस्थ श्री. नरेश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शिबीर कालावधीत व्यक्तिमत्व विकास व समाज प्रबोधन, ग्रामस्वच्छता, रस्ते-दुरूस्ती, आपत्कालीन व्यवस्थापन, जलसाक्षरता- वनराई बंधारा, सार्वजनिक आरोग्य जाणीव-जागृती, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या शिबिरादरम्यान श्री. अभिजीत कुंभार, मुख्याधिकारी मंडणगड नगरपंचायत (विद्यार्थी आणि स्पर्धा परिक्षा), युवा लेखक मंडणगड श्री. भा. ला. लुटे (मराठी साहित्य), श्री. कुणाल मंडलिक (इफ्फेक्टिव पब्लिक स्पिकिंग), श्री. दिलीप कुलकर्णी (निसर्गावन), श्री. अक्षय कोकणे (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोजगार), आदी विविध विषयांतील तज्ञ मान्यवर शिबिरार्थीना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण रुग्णालय मंडणगड यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे.

एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी सहा. प्रा. अमोल राजेशिर्के, सहा. प्रा. मंगेश ठसाळे, डॉ. ग्रंथपाल दिगंबर हेमके, सहा. प्रा. राजेंद्र राऊत, सहा. प्रा. सायली घाडगे तसेच विद्याथ्री प्रतींनिधीशुभम कीजबिले, अर्पिता बोरकर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.