मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन स्वरोजगार निर्मिती करा : मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैदही रानडे यांचे प्रतिपादन.

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे सुरू असलेल्या लेडीज ब्युटी पार्लर आणि लेडीज टेलरिंग प्रशिक्षणाला रत्नागिरी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैदही रानडे यांनी भेट दिली. भेटीदरम्यान सर्व प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला. प्रशिक्षण कालावधीत मिळणार्‍या सर्व सेवा सुविधा यांची माहिती घेतली. लेडीज ब्युटी पार्लर प्रशिक्षणात शिकविण्यात आलेल्या आय ब्रो, फेशियल, ब्लीच, हेड मसाज, हेअर स्टाईल, हेअर कटींग, कलरिंग, हेअर स्पा, मेहंदी, ब्रायडल मेक अप, साडी ड्रेपिंग आणि टेलरिंग प्रशिक्षणात शिकविण्यात आलेल्या विविध प्रकारचे ड्रेस, लहान मुलांचे गणवेश, ब्लावुज इ. विविध प्रात्यक्षिकांची सविस्तर माहिती घेतली. आपल्याकडे आलेल्या ग्राहकाला आपल्याकडील जास्तीत जास्त सुविधा कशी देता येईल यासाठी प्रयत्न करावे. संभाषण कौशल्याच्या आधारे जास्तीत जास्त ग्राहक जोडले जातील याची काळजी घ्यावी. टेलरिंग आणि ब्युटी पार्लर व्यवसायला सध्या गावोगावीसुद्धा मागणी वाढत आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, विविध कार्यक्रम यामध्ये चांगल्या प्रकारे संधी वाढत आहे, मिळालेल्या संधीचा लाभ घेवून स्वरोजगार करावा असे मार्गदर्शन त्यांनी भेटीदरम्यान केले. आरसेटी मध्ये मिळणार्‍या सर्व सेवा सुविधा उत्तम असून त्याबद्दल समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान बँक ऑफ इंडिया डेप्युटी झोनल मॅनेजर मा. श्री. अंजनी कुमार आझाद सिंग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोंन्ंनती अभियान रत्नागिरी जिल्हा अभियान व्यवस्थापक मा. श्री. अय्याज पीरजादे, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक मा. श्री. ऋषिकेश कुरणे इ. मान्यवर उपस्थित होते.