मालवण पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार गुन्हा दाखल
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील हडी कोथेवाडा येथील जागृत देवस्थान मार्गेश्वर मंदिर येथील पितळेच्या धातूच्या घंटा अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या आहेत. 17 डिसेंबर रात्री ते 18 डिसेंबर सकाळी यां कालावधित चोरी झाली.
दरम्यान यां प्रकरणी प्रकाश तोंडवळकर व ग्रामस्थांनी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु आहे.









