वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांचे पशुधन मालकांना आवाहन
चिपळूण (प्रतिनिधी) :–वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सतर्फे दि. ५ ते ९ जानेवारी २०२४ रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन २०२५ कृषी महोत्सवात ६ जानेवारी रोजी सुदृढ,निरोगी,सुंदर पशुधन व ८ जानेवारी रोजी जास्त दूध देणारी म्हैस व गाय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पशुधन मालकांना आकर्षक बक्षीस सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. गतवर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. गेल्यावर्षी या स्पर्धेत १०० पशुधन सहभागी झाले होते.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव चिपळूण नगर परिषदेच्या स्वा.वि. दा. सावरकर मैदानात असणार आहे. या महोत्सवादरम्यान भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यातआले आहे.
यामध्ये ६ जानेवारी रोजी सुदृढ,निरोगी, सुंदर पशुधन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त दूध देणारी म्हैस, सर्वात जास्त दूध देणारी गाय, सदृढ निरोगी सुंदर बैल, सदृढ निरोगी सुंदर गाय,
सदृढ निरोगी सुंदर म्हैस,
सदृढ निरोगी सुंदर रेडा,
सदृढ निरोगी सुंदर गाय वासरू,
सदृढ निरोगी सुंदर म्हैस वासरू अशी ही स्पर्धा होईल. तर ८ जानेवारी रोजी जास्त दूध देणारी गाय व म्हैस स्पर्धा होईल तरी नोंदणीसाठी ९४२२६६११९७,
९६३७६०५७५७,
७५८८३३००११,
९८९०३९३८२३,
७७२२०४५०४८ या नंबर वर नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा.नोंदणी चालू आहे असे आवाहन करण्यात येत आहे.
या स्पर्धेतील विजेते पशुधन मालक प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सहभागी पशुधन मालकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.











