माजी सैनिक पांडुरंग उदेग यांचे निधन

चिपळूण : तालुक्यातील कामथे खुर्द हरेकरवाडी येथील माजी सैनिक पांडुरंग अंबाजी उदेग यांचे रविवार 15 डिसेंबर 2024 रोजी 9.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षाचे होते.
माजी सैनिक पांडुरंग उदेग यांनी 9 वर्षे आर्मीमध्ये देशसेवा केली.

1962 सालच्या चीनच्या युध्दातही ते सहभागी होते. मात्र देशसेवा बजावत असतानाच त्यांना अर्धांग वायू गेल्याने राजीनामा द्यावा लागला. त्यांना समाजकार्याची खूप आवड होती गावच्या विकासासाठी ते हिरीरीने पुढाकार घेत असत तसेच वारकरी संप्रदायची त्यांना खूप आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून दोन मुली, जावई, सात नातवंडं, असा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य बुधवार 25 डिसेंबर रोजी कामथे खुर्द हरेकरवाडी येथे राहत्या घरी म्हणजे होणार आहे.