आर.आर.आबा पाटील जिल्हा सुंदर गाव अंतर्गत परुळेबाजार ग्रा.पं. चे समिती कडून मूल्यमापन

 

परुळे |  प्रतिनिधी : आर. आर आबा पाटील जिल्हा सुंदर गाव अंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीच मूल्यमापन तपासणी समिती कडून आज करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग विशाल तनपुरे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर विस्तार अधिकारी श्री. शिंगाडे जिल्हा आरोग्य चे. निलेश मठकर. विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी दिनकर चाटे विस्तार अधिकारी कृषी सुप्रिया कोरगावकर आरोग्य निरीक्षक श्री. तोरसकर यांचा समावेश होता. यावेळी सरपंच प्रणिती आंबड पालकर उपसरपंच संजय दूधवडकर माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू ग्रामसेवक शरद शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते यावेळी आर. आर आबा पाटिल जिल्हा सुंदर गाव स्पर्धेत तालुका स्तरावर क्रमांक मिळवला होता त्यामुळे जिल्हा स्तरावरून मूल्यमापन करण्यात आले. समितीचे स्वागत सरपंच यानी केले ग्रामसेवक शरद शिंदे यांनी समितीला माहिती सादर केली