४ जानेवारी ला ओणीत करकरे अकॅडमी चे शिबिर

 

माखजन |वार्ताहर : गणित विषय विद्यार्थ्यांना अतिशय सहज व सोपा जावा,यासाठी राजापूर तालुक्यातील ओणी येथे शांताराम भट इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गणिताचा जादूगार म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या महेंद्र करकरे यांच्या करकरे अकॅडमी चे ४ जानेवारी २०२५ रोजी शिबीर होत आहे.

 

 

बरेचदा गणित विषय विद्यार्थ्यांना किचकट व कळायला अवघड जात असल्याने परीक्षेत देखील कमी गुण मिळतात.पण हाच विषय सोप्या पद्धतीने शिकवून,बारकावे समजावून सांगून,काही क्लुप्त्यांच्या आधारे गणिते सोडवण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्याने, गणित विषय सोपा जाऊ शकतो.हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत ओणी शिक्षण मंडळाने या शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरात नुसते ओणी हायसकूल चे विद्यार्थी नव्हे तर परिसरातील विद्यार्थीही या शिबिरात सहभागी होऊ शकणार आहेत.या शिबीराचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रदीप संसारे यांनी केले आहे तर संस्था अध्यक्ष अँड वासुदेव तुळसणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.अधिक माहिती साठी पर्यवेक्षिका सौ साक्षी शिंदे (८००७३००३२१)यांच्या शी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.