देशभरात श्री राम जन्मभूमी अर्थात अयोध्या येथे श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. यामुळे सर्व हिंदू बांधवांच्या मनामध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे.
या अनुषंगाने कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा या संस्थेने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमांतर्गत दिनांक 20 जानेवारी रोजी प्राध्यापिका सौ.अंजली बर्वे यांचे नित्य स्मरावा राम या विषयावर पाच वाजता प्रवचन, दिनांक 21 जानेवारी रोजी आदर्श कीर्तनकार ह. भ. प. श्री. कुमार भाट्ये यांचे राम भक्त वेणास्वामी चरित्र या विषयावरती सुश्राव्य कीर्तन आणि सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी गीत रामायणातील निवडक गाण्यांच्या सुरेल मैफिलीचा सप्तसूर मुझिकल हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हे सर्व कार्यक्रम श्रीमान यशवंत हरी गोखले भवन, छत्रपती संभाजी नगर, वेधशाळे समोर, नाचणे , या कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या इमारतीमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा आनंद सोहळ्याचे हे सर्व कार्यक्रम सर्व समाजासाठी खुले असून श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठेचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.








