खेड (प्रतिनिधी) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक येथे पॅरालिम्पिक स्पोर्टस् असोशिएशनच्या
वतीने आयोजित दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय पॅरालिम्पिक चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्यांग क्रीडा प्रतिष्ठानच्या दोघांनी एक सुवर्ण व ३ रौप्यपदके प्राप्त केली.
या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी केली. प्रज्ञा जंगम, हर्षद चव्हाण या दोघांनी कसब सिद्ध करत पदकेही मिळवली. या दिव्यांग खेळाडूंना दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष व क्रीडाशिक्षक प्रशांत चव्हाण- यांचे मार्गदर्शन लाभले.









