वेंगुर्ले | प्रतिनिधी : इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला संस्थेच्या पदाधिकारी यांनी जिव्हाळा सेवाश्रम कुडाळ माड्याचीवाडी येथे भेट दिली. तेथे लाभ घेत असलेले निराधार वृद्ध व अपंग यांच्याशी संवाद साधत त्यांना नित्य-उपयोगी साहित्य मेडिकल कीट, डायपर, जेवणाचे साहित्य, हायजिन कीट, कपडे, बिस्कीट व इतर भेट दिले.
यावेळी अध्यक्ष मंजुषा आरोलकर, डॉक्टर पूजा कर्पे, गौरी मराठे , श्रिया परब, दिपाली वाडेकर, रसिका मठकर , सई चव्हाण , वंदना शितोळे आश्रमाचे सुरेश बिर्जे उपस्थित होते.












