नागपुरातील कुटुंबावर रत्नागिरीत कोसळला दुःखाचा डोंगर

dead

 

एका सदस्याचे रेल्वे स्थानकावरच हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी
नाताळच्या सूट्टीसाठी पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झालेल्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला. हे कुटूंब रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर उतरल्यावर त्यांच्यातील एका सदस्याचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. सुमारास घडली.

सचिन श्रीकृष्णराव तेलरांधे (45, मुळ रा.मनिषनगर नागपूर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढ पर्यटकाचे नाव आहे. तेलरांधे कुटुंब पर्यटनासाठी नागपूरहून रत्नागिरीला आले होते. सोमवारी सकाळी 9.30 वा. सुमारास तेलरांधे कुटुंब रत्नागिरी रेल्वेस्टेशनव उतरले असता त्यातील सचिन तेलरांधे यांच्या छातीत कळ येउन दुखू लागले. त्यांच्या नातेवाईकांनी आणि रेल्वे कर्मचार्‍यांनी मिळून त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सायंकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.