रत्नागिरी एमआयडीसीतील घटना
सीसीटीव्ही फुटेजमधे दिसणाऱ्या महिलांबाबत कळवण्याचे पोलिसांचे आवाहन
रत्नागिरी : मंगळवारी दुपारी साधारण 4 ते 5 राजस्थानी पोशाखतील महिला व सोबत मुले घेऊन अचानक घरात घुसून पैसे मागत असून मिळतील त्या वस्तू उचलत आहेत तर जबरदस्तीने घेऊन जात आहेत.
सदर महिलानी रत्नागिरी एमआयडीसी येथील कॉनफोर्ड इंडस्ट्रीज येथे घरात घुसून मालक कल्पना भिसे यांचे कपाटातील मंगळसूत्र व अंगठी जबरदस्तीने घेऊन गेलेले आहेत.
महिला सीसीटीव्ही मधे दिसत असून त्या महिलांबद्दल माहिती मिळाल्यास ग्रामीण पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.












