‘देवरुख जंगल नाईट सफारी’ ने पुण्यातील पर्यटक मंत्रमुग्ध

देवनगरी देवरुख पर्यटन प्रकल्पाच्या अंतर्गत क्रांती व्यापारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

देवरुख (प्रतिनिधी)कोकणातील पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या देवनगरी देवरुख पर्यटन प्रकल्पाच्या अंतर्गत क्रांती व्यापारी यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या “देवरुख जंगल नाईट सफारी” या अनोख्या अनुभवाने पुण्यातील पर्यटकांना मंत्रमुग्ध केले आहे. कोकणात प्रथमच योजलेल्या पर्यटकिय 7 ऑर्गनाईज्ड ट्रिप्सपैकी एक असलेली ही जंगल सफारी पर्यटकांना रोमांचक जंगल जीवनाचा अनुभव देते. *अंधाऱ्या रात्रीची सफर, आकाश दर्शन, थरारक “भुताचा पूल”, निबिड काळाकुट्ट अंधार, जंगलातील निरव शांतता, विविध प्राण्यांचे आवाज, आणि काही प्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शन* – या सर्व गोष्टींनी पुण्यातील पर्यटकांच्या मनावर गारूड केले.

 

 

*पर्यटकांची प्रतिक्रिया*

 

देव नगरी देवरूख पर्यटन बरोबर जंगल night सफारी चा योग आला…निखिल जी आणि अण्णा बेर्डे pickup साठी घरी आले रात्री १० वाजता …जाता जाता वाटेत माहिती घेत असतानाच उत्सुकता वाढत गेली सफारी ची…तोपर्यंत काळा कुट्ट अंधार आणि घनदाट अरण्यात कधी शिरलो कळलेच नाही..निरव शांतता..फक्त गाडीचा आवाज तो सुधा नको वाटत होता…विविध आकाराची झाडे, वेली निसर्गाचे अदभुत दर्शन घडवत एका पाण्याच्या टाकी पाशी पोचलो..शिडीवर चढण्याचा यशस्वी प्रयत्न करून आकाश दर्शनाचा अविस्मरणीय आनंद घेतला…वाटेत भुताचा पुल..त्याची कहाणी…नदीचा खळखळाट ऐकला.

 

पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून तर डोळे चमकले…पुढे तर वेड्या वाकड्या झाडांना चुकवत चाफा नागनाथ मंदिरात पोचलो…गाभारा बघितला आणि ध्यान च लागले…धब धब्याचा आवाज शांततेला भेदून जात होता. निघण्याची ईच्छा नव्हती..पण परतीचा वाटे ला लागलो…काही प्राण्यांचे आवाज..रान मांजर , मुंगूस दर्शन घेऊन आगळ्या वेगळ्या सफारीची सांगता झाली आणि भौतिक जगात परतलो…सुखद आठवणी घेऊया. 2 तासांच्या या थरारक सफारीनंतर, पर्यटकांनी त्यांच्या अनुभवाचे भरभरून कौतुक केले. *”हा अनुभव केवळ अप्रतिम होता. आम्ही लवकरच देवनगरी देवरुख च्या इतर ट्रिप्सदेखील पाहणार आहोत!”* अशा सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. *त्यांनी इतर पर्यटकांनाही “देवनगरी देवरुख” प्रकल्पाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन केले आहे.* *तुमचाही अनुभव अविस्मरणीय बनवा!* जंगलाच्या गूढ वातावरणात थरारक सफारीची मजा घ्या आणि कोकणाच्या निसर्गाशी नाते जोडा. आजच तुमचे बुकिंग करा!

 

*संपर्क: क्रांती व्यापारी, देवनगरी देवरुख*

 

*आमचे वचन: तुम्हाला हर एक ट्रिप रोमांचक आणि संस्मरणीय वाटेल!*