महाडच्या वरंधा घाटमधून वाहतूक सुरूच

कागदोपत्रीच वाहतुकीसाठी बंद?
खेड(प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वरंधा घाट केवळ कागदोपत्रीच बंद असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात वरंधा घाटातून खुलेआमपणे वाहतूक सुरूच आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीच वरंधा घाट धोकादायकच बनला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी धोकादायक स्थिती असून हा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा जीव टांगणीवरच आहे.
महाड तालुक्यातून जाणारा व पुणे जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. म्हाप्रळ- पंढरपूर मार्ग हा पुणे जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने गेली अनेक वर्षापासून मार्गावरून वाहतूक सुरू आहे. आंद घाटामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत: सार्वजनिक बांधकाम करण्याच्या ताब्यातील घाटातील रस्त्याचे सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या माध्यमातून दीकरण करण्यात येत आहे. या ांदीकरणासाठी कोट्यावधी पये मंजूर होवूनही दोन वर्षापासून अद्याप महाडपर्यंत पूर्णच झालेला नाही.
रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी एक महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामाकरिता घाट बंद राहील, असे आदेश पारित केले होते. मात्र, प्रत्यक्षात घाटातून आज घडीलाही वाहतूक सुरूच आहे. रस्त्यात टाकलेल्या दगडी मातीचा भराव बाजूला करून वाहन चालक घाटातून मार्ग काढत प्रवास करत आहेत. मे महिन्यासह पावसाळ्याच्या तोंडावर घाटामध्ये ठिकठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून खोदकाम करून संथ गतीने काम सुरू आहे. घाटात केलेला खोदकामामुळे पावसाळ्याच्या काळात दगडी किंवा मातीचा भराव रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याकरिता रस्त्यामध्ये मोठ्या दगडी ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, या दगडी तात्पुरत्या स्वरूपात बाजूला केल्या गेल्या आहेत. म्हाप्रळ भोर पंढरपूर रस्त्यावर धोकादायक स्थिती आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी अजूनही सुस्तच असल्याचे दिसून येत आहे.