फोंडाघाट येथील युवती बेपत्ता

कणकवली : साक्षी अविनाश घोडके ( वय २१, रा. विद्यानगर, फोंडाघाट ) ही युवती १ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद तिचे वडील अविनाश शंकर घोडके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. साक्षी ही पणदूर येथील कॉलेजमध्ये शिकत आहे. १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ती फोंडाघाट येथील राहत्या घरातून बाहेर पडली. घरातून निघताना सॅक मध्ये कपडे भरून घेऊन गेली असून तिचा रंग गोरा आहे. उंची ५ फूट असून हनुवटीवर काळा तीळ असा वर्ण आहे.