आपेडे म्हापर्लेवाडीतील ३५ वर्षीय तरुणाचा सर्प दंशाने मृत्यू 

नववर्षाच्या दिवशी ची घटना 

खेड (प्रतिनिधी)खेड तालुक्यातील आपेडे गावातील म्हापर्लेवाडीतील ३५ वर्षीय तरुणाचा सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू

ओढावल्याची घटना नवं वर्षाच्या पहिल्या दिवशी घडली या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे

 

 

मंगेश दामु म्हापार्ले रा आपेडे म्हापर्लेवाडी असे त्या सर्प दंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे हा तरुण आपेडे गावच्या लंबाडे वाडी ते उधळे कदमवाडी अशा पायवाटेने पायी चालत येत असताना त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर सर्पाने दंश केल्याने त्याला उपचारार्थ कळबणी बुद्रुक येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यु झाला

 

या घटनेची खबर कळबणी बुद्रुक येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी येथील पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याप्रमाणे आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली आहे