खेड (प्रतिनिधी) नववर्षाच्या स्वागतासाठी पार्श्वभूमीवर पुणे येथून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे – करमाळी साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ फेऱ्या चालवण्यात आल्या. ८ जानेवारी रोजी स्पेशलची अखेरची फेरी धावणार आहे.
०१४०७/०१४०८ क्रमांकाची पुणे- करमाळी साप्ताहिक पुणे येथून पहाटे ५.१० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.२५ वाजता करमाळी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात करमाळी येथून रात्री १०.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पुणे येथे पोहचेल. या स्पेशलला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम स्थानकात थांबे आहेत











