चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील एका बंद घरामध्ये अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले १ लाख 88 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून दिवसा घरफोडी केली आहे. या घरफोडी प्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकामध्ये अज्ञाता विरुद्ध 2 जानेवारी रोजी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष शंकर रीळकर ( वय 53, रा. पिंपळी खुर्द, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या मुदतीत त्यांच्या घराच्या पाठीमागील लोखंडी दरवाज्याची जाळी लोखंडी पहार आणि कोयतीच्या सहाय्याने कापून दरवाजा उघडून त्या पुढे असलेल्या लाकडी दरवाजा लोखंडी पार आणि कोयतीच्या साह्याने तोडून आज प्रवेश केला. त्यानंतर देवघरात असलेल्या लोखंडी कपाटातील १ लाख ५ हजार रुपये किमतीचे 35 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र, 45 हजार रुपये किमतीचा पंधरा ग्रॅम वजनाच्या सोन्याचा हार आणि 38 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्या आहे. या प्रकरणी अज्ञाता विरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 331 (3) ३05 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.









