वेरवली खुर्द गावातील शिवसेनेच्या (उबाठा) युवा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील वेरवली खुर्द गावामध्ये शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार पडले असून या गावातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे .

सदरचा पक्षप्रवेश कार्यक्रम हा नुकताच भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर सरचिटणीस शैलेश खामकर, शक्ती केंद्रप्रमुख प्रथमेश बेंडल, युवा अध्यक्ष सत्यवान राणे, बुथ अध्यक्ष विजय यादव, संतोष पानगळे तसेच बाळकृष्ण राणे, संजय प्रिंदावणेकर, कृष्णा जाधव, संजय मोसमकर ,मंगेश लोकम, प्रदीप बेंडल ,राजेंद्र बेंडल, प्रकाश अलीम यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
या पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नितीन जोशी, मनोज करमरकर, अक्षय यादव, विनोद करमरकर, मनोज यादव, वैभव करमरकर,आकाश यादव, उमेश साळसकर, अमर यादव, चंद्रकांत राणे, सतीश यादव, अभिजीत यादव, विनायक यादव, साहिल यादव या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या सर्वांचे भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, सरचिटणीस खामकर यांनी पक्षाची शाल घालून स्वागत केले.