गावखडी/वार्ताहर
श्री स्वामी देव व श्री गुरुदेव दास दिगंबर स्वामी यांच्या कृपेने प्रतिवर्षी मठामधे नवरात्रौत्सव दरम्यान ललिता पंचमी ते महानवमी असा पांच दिवसांचा श्री भगवती आणि परब्रम्ह श्री स्वामी समर्थ देव यांचा पंचरात्रौत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षी पंचरात्रौत्सव सोहळा शनिवार दि. – २७ सप्टेंबर २०२५ ते बुधवार दि. – १ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे. पंचरात्रौत्सव सोहळ्यामधे प्रथम दिन पंचमी श्री ललिता देवी पूजन, द्वितीय दिन षष्ठी देवी पूजन, तृतीय दिनश्री महालक्ष्मी पूजन, चतुर्थ दिन श्री दुर्गादेवी पूजन, पंचम दिन श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली पूजन, अशाप्रकारे कलश स्थापन करून पूजन होईल.
तरी कलश पूजनाला बसून पूजनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तगणांनी आपली नांवे त्वरीत मठामध्ये नोंदवावीत
संपर्क 9404496576, 9373098775










