पोयनार – अलाटेवाडीतील शेवरोबा मंदिराचा १३ रोजी वर्धापनदिन

खेड(प्रतिनिधी) खेड  तालुक्यातील पोयनार – अलाटे वाडी येथील श्री शेवरोबा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने श्री शेवरोबा मंदिराचा १३ जानेवारी रोजी वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
सकाळी ८ वाजता श्री शेवरोबा देवस्थानावर महाभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११ वाजता महाड येथील श्याम मिरगळ यांचे कीर्तन, दुपारी १ वाजता सत्कार समारंभ झाल्यानंतर अनिल बिरवटकर यांच्यातर्फे महाप्रसाद होईल. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते रामदास कदम, मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार अनिकेत तटकरे, संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.