विनयभंगप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल

देवगड : प्रतिनिधी

 

तालुक्यातील एका गावात राहणाèया विवाहित महिलेला शिवीगाळ व धमकी देवून अश्लील हावभाव व हातवारे करून पीडीतेचा पाठलाग केल्याप्रकरणी संशयित सचिन सुर्यकांत राघव(३२) याच्याविरूध्द विजयदूर्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २३ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता घडली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडीत महिला ही २३ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता आपल्या मुलाला शाळेत घेवून जात असताना संशयित हा त्याचा घराच्या कुंपणालगत असताना पीडीत महिलेला वाईट हेतूने हातवारे करून मोठमोठ्याने शिवीगाळ करून धमकी दिली तसेच पीडीत महिला शाळेत व कलम बागेत जातेवेळी संशयिताने अश्लील हावभाव व हातवारे करून पीडीतेचा पाठलाग केला.याबाबतची फिर्याद पीडीत महिलेने विजयदूर्ग पोलिस स्थानकात दिली आहे.या फिर्यादीनूसार संशयित सचिन राघव याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलिस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत.