वेंगुर्ले येथे १० जानेवारी पासून “कै. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा”

सिंधुदुर्ग सह कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई तील संघांचा सहभाग

वेंगुर्ले l दाजी नाईक:कलावलय वेंगुर्ला आयोजित कै. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १० ते १२ जानेवारी या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

 

दि.१० रोजी सायं. ५ वा. ज्येष्ठ सिने, नाट्य अभिनेते नंदकुमार पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजन गिरप, उद्योजक दिगंबर नाईक, बीकेसीचे सतिश डुबळे, कलावलयचे अध्यक्ष बाळू खामकर, पदाधिकारी संजय पुनाळेकर, सुनिल रेडकर आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर यांची ‘कलम ३७५‘, उगवाई कलारंग-फोंडाघाट यांची ‘जापसा‘, संत राऊळ महाराज महाविद्यालय-कुडाळ यांची ‘ऑफलाईन‘, ढ मंडळी-कुडाळ यांची ‘वाल्मिकी, दि. ११ रोजी सायं. ४ पासून मुख्तलीफ थिएटर-कोल्हापूर यांची ‘निर्झर‘, शब्दांकूर रंगमंच-आरवली यांची ‘ओळख‘, नाटकवेडे-रत्नागिरी यांची ‘विठाई‘, मॅडबॉक्स थिएटर-नवी मुंबई यांची ‘मै‘, कलांगण-मालवण यांची ‘विवर‘, दि. १२ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून गायन समाज देवल क्लब-कोल्हापूर यांची ‘ऑलमोस्ट डेड‘, दृष्टी-पुणे यांची ‘ओळख‘, थिएटरवाले-मुंबई यांची ‘चोली के पिछे क्या है‘, बी.व्ही.थिएटर्स-कुडाळ यांची ‘ऑफलाईन‘, अंब्रेश्वर थिएटर्स-मुंबई यांची ‘चारू‘, कलासक्त मुंबई यांची ‘पूर्णविराम‘, क्रिएटीव्ह कार्टी यांची ‘इंटररोगेशन‘ अशा एकांकिका सादर होणार आहेत. नाट्य रसिकांनी या एकांकिका स्पर्धेला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कालावलय परिवारातर्फे करण्यात येत आहे.