रिक्षा चालक-मालक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
शिरगाव ( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील शिरगाव येथील रिक्षा चालक-मालक संघ आयोजित २९ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार १८ जानेवारी रोजी भव्य खुली नृत्य स्पर्धा ( सोलो) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास ५५५५ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ३३३३ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकांस २२२२ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी १०० रुपये असून १३ जानेवारी पर्यंत आपले नाव नोंदणीसाठी शरद साटम मोबा.९८२३६५०११ व तारक चव्हाण मोबा. ९९२१३८१८१२ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे. असे कळविण्यात आले आहे.










