तोरसोळे येथे अवैध दारू धंद्यावर कारवाई

साडेपाच हजार रूपये कमतीची गोवा बनावटीची दारू जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई

देवगड : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने गोवा बनावटीची दारू बिगरपरवाना बाळगल्याप्रकरणी तोरसोळे पारवळवाडी येथील सतिश गंगाराम परब(५०) याच्यावर कारवाई केली असून ५६२५ रूपये qकमतींची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.ही कारवाई दि. ३ एप्रिल रोजी दुपारी १२.४० वा.सुमारास तोरसोळे पारवळ फाटा येथील सुवर्णा जनरल स्टोअर्सच्या पाठीमागे असलेल्या आंबा काजू बागेत केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग qसधुदूर्ग यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी ३ एप्रिल रोजी दुपारी १२.४० वा.सुमारास तोरसोळे पारवळ फाटा येथील सुवर्णा जनरल स्टोअर्सच्या पाठीमागे असलेल्या आंबा काजू बागेत अवैधरित्या गोवा बनावटीची दारू छापा टाकून जप्त केली आहे.ही दारू बिगरपरवाना स्वत:च्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी तेथिलच सतिश गंगाराम परब याच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.संशयिताच्या ताब्यात असलेल्या २७५० रूपये qकमतीच्या होडकाच्या २२ बाटल्या व २८७५ रूपये qकमतीच्या हनी ब्लेम प्युअर बँडीच्या २३ बाटल्या असा एकूण ५६२५ qकमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली असून या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.या घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाचे पोलिस हवालदार किरण कृष्णा देसाई यांनी दिली असून तपास पो.हे.कॉ.गणपती गावडे करीत आहेत.