मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा वर्धापन दिन उत्साहात

खेड(प्रतिनिधी) मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य आयोजित संस्थेचा २४ वा वर्धापनदिन सोहळा व पत्रकार दिनानिमित्त पत्रलेखकांचे राज्यस्तरीय संमेलन व राज्यातील नामवंत पत्रकारांना “पत्रकार भूषण” आणि अन्यही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या  व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
समारंभ अध्यक्ष – माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय रेल्वेमंत्री पद्मभूषण – . श्री. रामभाऊ नाईक , यांच्या सोबत संस्थेचे अध्यक्ष – मा. श्री. एकनाथ बिरवटकर, प्रमुख कार्यवाह – मा. श्री. संतोष धोत्रे, संपादक – . श्री. बाळ पंडित, संस्थेचे जेष्ठ उपाध्यक्ष – श्री. प्रकाशजी लोलेकर प्रशांत गमरे आदी यावेळी उपस्थित होते