खेड(प्रतिनिधी)
मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी ११ च्या सुमारास कार व एसटी यांच्यात अपघात घडला. अपघातामुळे काही कळ वाहतूक ठप्प झाली. अपघातात कारचे नुकसान झाले.
भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. घडलेल्या अपघाताने वाहतूक कोंडी झाली, अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.












