वार्ताहर | पाली : माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज, नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नाणीज येथे दि.९ व १० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
९ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. विज्ञान दिंडी, ११.०० ते १.०० वा. उदघाटन, दुपारी दुपारी १ ते ५ पर्यंत प्रतिकृर्तीचे परीक्षण आणि प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले, दुपारी १.०० ते ०४.०० वा. प्रश्न मंजुषा स्पर्धा व विज्ञान प्रतिकृती कार्यशाळा. १० जानेवारी रोजी सकाळी ११.०० ते १ वा. पर्यंत विज्ञान शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग व्याख्याते प्राध्यापक अनुराग पाणीग्राही विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान,
१० ते ३ वा. प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले, दुपारी ४ ते ५ वा. समारोप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
या प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उदघाटक गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम, प्रमुख उपस्थिती खा.नारायण राणे, सुनील तटकरे, आ.निरंजन डावखरे, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे,भास्कर जाधव,किरण सामंत,शेखर निकम, जि. प. रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हाधिकारी
एम. देवेंदर सिंह,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, नाणीज शिक्षणोत्तेजक मंडळ नाणीज अध्यक्ष प्रशांत कदम,
मा.श्री.जे.पी. जाधव, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग महेश चोथे,नाणीज पंचक्रोशी शिक्षणोतेजक मंडळाचे उपाध्यक्ष राजेश कोळवणकर, सचिव सुधीर कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र दरडी,
नाणीज सरपंच विनायक शिवगण,गटविकास अधिकारी जे.पी. जाधव,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत,शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार,गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे,उपशिक्षणाधिकारी, माध्य.गोपाळ चौधरी,जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.एम.कासार,उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)सुनिता शिरभाते,उपशिक्षणाधिकारी, माध्य. नरेंद्र गावंड,शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव,जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष सुदेश कदम,जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष अयुब मुल्ला,माध्यमिक विद्यामंदिर अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, नाणीजच्या मुख्याध्यापक रुपाली सावंतदेसाई उपस्थित राहणार आहेत.
तरी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेण्याचा आवाहन
सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर संघटना माध्यमिक व प्राथमिक विभाग यांनी केले आहे










