मालवण | प्रतिनिधी : घोटगे सोनवडे घाट रस्त्याचा शुभारंभ लवकरात लवकर करण्यात येणार आहे. असे आमदार निलेश राणे यांनी माहिती देताना सांगितले.
घोटगे सोनवडे घाट रस्त्यासाठी राणे साहेब पालकमंत्री होते त्यावेळी हा डीपीआर बनवण्यात आला. त्यानंतरच्या काळात विरोधकांनी बनविलेल्या डीपीआर बाबत गेल्या दहा वर्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. या खात्याचे मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात अनेक बैठका घेत प्रगती पथावर नेले. त्यामुळे आता डिपीआर लवकरात लवकर मंजूर होईल. पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. यांचा विचार करून हे बनविण्यात आले. त्यानुसार पर्यावरण विभागाची कमिटी येऊन गेली. त्या कमिटीने सर्व शहानिशा केली आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सर्वगौड उपस्थित होते. त्यामुळे घोटगे सोनवडे घाट रस्त्याचा शुभारंभ लवकरात लवकर करण्यात येणार आहे असेही आमदार निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.











